Sunday, 12 August 2018

शिक्षण परिषद

देऊळगावराजे केंद्राची शिक्षण परिषद वडगाव दरेकर येथे पार पडली.केंद्रप्रमुख श्री.शब्बीर शेख यांनी मुलभूत वाचन विकास साठी कृती आराखडे कसे तयार करायचे याविषयी मार्गदर्शन केले.
केंद्रात बदलीने नवीन आलेल्या शिक्षकांचे स्वागत करण्यात आले,बदली झालेल्या शिक्षकांना निरोप देण्यात आला.
आजची शिक्षण परिषद खूप प्रेरणादायी ठरेल असे अनुभव आले.




Thursday, 12 January 2017

तंत्रस्नेही

जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र 07जानेवारी 2017  या शासन निर्णयानुसार
आपण सर्वांना 100% वर्ग Digital करायचे आहे, या करिता आपण सर्वांना, 100% शिक्षकांना Techno-saavy घोषित करायचे आहे. या करिता प्रत्येकाने आपली स्वतः ची online नोंदणी खालील लिंक भरून करावी.
सर्व सन्माननीय केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी यांनी सुद्धा आपल्या केंद्रातील, बिटमधील 100% शिक्षक नोंदणी करुन स्वतः ला Techno-saavy घोषित करतील या साठी प्रेरणा द्यावी.
Registration करीता खालील लिंक भरा.
http://www.technoteachers.in/registration.php
आपण जर या अगोदर लिंक भरली असेल, तर खालील लिंक वर आपले नाव पाहता  येईल.
नाव यादीमध्ये असेल तर पुन्हा लिंक भरण्याची गरज नाही. नाव उपलब्ध नसेल तर वरील वर लिंक नाव नोंदवा.
खालील लिंक वर नाव आहे किंवा नाही ते पहा 

लेक शिकवा

 लेक शिकवा अभियान 
मा.शिक्षण संचालक,म.रा.पुणे यांच्या पत्रानुसार लेक शिकवा अभियान दि.३ ते २६ जानेवारी २०१७ या कालावधीत शाळास्तरावर आयोजित करावयाचे आहे.विविध स्पर्धा, कार्यक्रम दररोज शाळास्तरावर घ्यावयाचे आहेत.
३.१.१७ शाळेतील शिक्षिकांचा गौरव करणे,शाळाबाह्य मुलींची यादी करणे,माता पालक मेळावा घेणे.
४.१.१७ शालेय गरजेच्या वस्तुचे विविध संस्थाकडुन देणगी रुपाने घेऊन शाळेत मुलींना वाटप करणे.
५.१.१७ शाळेतील कर्तृत्ववान माजी विद्यार्थीनींचा परिपाठाच्या वेळी सत्कार करणे.
६.१.१७ शाळाबाह्य मुलींच्या घरभेटी घेणे.शाळा सुरुहोण्यापुर्वी एक तास अगोदर.
७.१.१७ स्थलांतरीत पालकांच्या मुलींना शाळेत दाखल करणे.आपल्या शाळा परीसरातील इतर शाळैच्या मुलींना आपल्या शाळेत प्रवेश देणे.
९.१.१७ महिला कार्यकर्तीचा सत्कार करणे.
१०.१.१७ भटक्या जाती जमातीच्या मुलींचे सर्वेक्षण सकाळी ७ ते ९ यावेळेत.
११.१.१७ घोषवाक्य स्पर्धा घेणे
१२.१.१७ मुलींच्या वक्तृत्व स्पर्धा व पुरस्कार
१३.१.१७ कृती अध्यापन दिन- शाळेत जाऊन शिविअ,केंद्रप्रमुख,मुअ यांनी प्रत्यक्ष अध्यापन करणे.
१४.१.१७ विद्यार्थी चित्रकला स्पर्धा विषय मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देईन दोन्ही घरी
१६.१.१७ मुलींच्या बुध्दीबळ स्पर्धा घेणे सकाळी ७  ते ९
१७.१.१७ आदर्श माता पुरस्कार पोस्ट आॅफीस,ग्रामपंचायत,बॅकेस भेट
१८.१.१७ निबंध स्पर्धा घेणे. सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर
१९.१.१७ चावडी वाचन कार्यक्रम
२०.१.१७ ज्यूडो कराटे प्रात्यक्षीक
२१.१.१७ मैदानी स्पर्धा- धावणे, लांबउडी,उंच उडी,थाळी फेक,भाला फेक
२३.१.१७ मुलींचे आरौग्य तपासणी
२४.१.१७ माता-शिक्षक-पालक संवाद सभा चित्र प्रदर्शन शाळास्तर
२५.१.१७ मुलींच्या कथाकथनांचा कार्यक्रम
२६.१.१७ अभियान समारौप. गुणी मुलींचा सत्कार,व्याख्याण शुर महिलांच्या जीवनावर,अभियानात भाग घेतलेल्या मुलींचा,महिलांचा सत्कार.
वरिल प्रमाणे कार्यक्रम शाळास्तरावर करुन लेक शिकवा अभियान प्रत्येक शाळेवर यशस्वी करावे. राबविलेल्या उपक्रमांची रजीष्टर मध्ये लेखी नोंद ठेवण्यात यावी.
दि.1.2.2017 अखेर BRC दौंड येथे जमा करावा.                         आदेशान्वये मा.गटशिक्षणाधिकारी पं.स.दौंड

Saturday, 7 January 2017

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र

सर्व शिक्षक मित्रांना नमस्कार,
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या उपक्रमात पुणे शिक्षण विभागासाठी फक्त ३८% शाळा प्रगत असल्यामुळे मा.सचिव साहेबांनी नाराजी व्यक्त केली आहे .व जिप पुणे शिक्षण विभागाने त्याना ३१ मार्च पर्यत वर्गशाळा केंद्र तालुका प्रगत होईल असा शब्द आढावा मिटींगमध्ये दिला आहे व आपण हे काम पुर्ण करण्यासाठी वर्ग ते तालुका नियोजन करीत असुन  आपला वर्ग १०० % दिनांक ३१ मार्च पर्यत प्रगत करावयाचा आहे.त्यासाठी हे सुक्ष्म नियोजन आवश्यक असून ते वस्तुनिष्ठ व प्रमाणिक मुल्यमापण हे या यशाची पहीली पायरी असणार आहे.आपण ते कराल असा १००% विश्वास आहे.मुल्यमापणानंतर ज्या बाबीत जे मुल कमी आहे त्यावर आपणास योग्य रितीने काम करता येईल .तसेच जो कठीण भाग, अडचणी जाणवतात त्यावर तालुकापातळीवर प्रश्न वेटेज नुसार  आपणास प्रशिक्षण देण्यासंबधी नियोजन करता येईल.तरी कोणत्या प्रश्नासाठी गुण जात आहेत त्यावर तुम्ही काम करावे.अशी अपेक्षा आहे.
पुर्ण तालुका प्रगत होणेबाबत हा प्रयत्न आहे.आपण सर्वानी यात झोकुन देऊन आपला वर्ग व शाळा प्रगत कराल हा विश्वास आहे.आपणा सर्वाना शुभेच्छा
आपलाच शिक्षक मित्र
शब्बीर शेख
केंद्रप्रमुख देऊळगाव राजे

Tuesday, 20 December 2016

शिक्षक सहविचार सभा

आज दि.20/12/2016रोजी आगरवाल विदयालय दौंड येथे दौंड बीटची मुख्या.सहविचार सभा पार पडली.
तालुक्याचे ग शि अ श्री.बेलखेडे साहेब,कें प श्री.शब्बीर शेख,श्री.गोरे सर,श्री.आढाव सर,श्रीम.धावडे मॅडम व दौंड बीटातील सर्व मुख्या.उपस्थित होते.
मुद्दे
1.शाळेच्या वेळात मोबाईल मुख्या.कडे जमा करावा
2.टाचणवही पाहिजे
3.मुख्या.लॉगबुक भरावे
4.शाळेत उशीरा येणारे शिक्षक लेटमार्क नोंदवा
5.तंबाखू मुक्त शाळा,शिक्षकांनी शाळेत व्यसन करू नये
6.100% मुलांचे आधारकार्ड काढावेत
7.प्रत्येक लाभार्थी मुलांचे बैंक खाते काढावे
8.सरल पूर्ण करावे
आधार काम,टॉन्सपर,टीचर असाइन वर्ग करा,बेसलाईन मार्क,संकलित मार्क भरा,
9.शाळाबाहय मुले पालकभेटी घ्या
10.शाळाबाहय मुले अनुदान नीट खर्च करा
11.ABLशाळा साहित्य वापर होतो का?
12.शिष्यवृत्ती 5/8 फार्म भरावे 100%मुले
जिल्हा परिषद फी भरणार आहे(खाजगी सोडून)
200रू शाळा संलग्नता फी शाळेने भरावी
13.income tax नीट भरावी
घर,प्रॉपटी,सोने
14.स्थायित्व लाभ प्रस्ताव
15.पं स येताना रजा घेऊन यावे किंवा
आवक मध्ये नावे नोंदवा
16.शालेय दुरूस्ती नाट दाखवा
17.10 वर्षात बदली पात्र
31मे 2017 ला
18.अपंग प्रमाणपत्र ओरीजिनल असावे
19.१ली ते ५वी शिक्षक
गणित प्रशिक्षण दौंडला 3 दिवस
20.वाचन वेग कार्यशाळा (उच्च प्राथ)
27/12/2016
स्थळ- ज्ञान प्रबोधनी ,scrert
21.अपूर्व विज्ञान कार्यशाळा
22.अर्हता वाढ करा
23.प्लस पोलिओ जनजागृती करा
24.उपस्थिती अॅप डाऊनलोड करा
वर्गशिक्षक नुसार माहिती भरा
25.वाहतुक समिती कार्यशाळा (खाजगी)
26.बालरंग महोत्सव
27.आचार संहिता पालन
28.शालेय रेकॉर्ड अपडेट
29.प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र जी आर वाचन
30.सर्व शिष्यवृत्या वाटप
31.शिक्षकांचे आदेश रजिस्टर ठेवा(फाईल)
32.अल्पसंख्याक शिष्यवृत्ती लक्ष दया
33.तुमची शाळा कुटुंब आहे वाद नको

श्री.गौतम बेलखेडे
मा.गटशिक्षणाधिकारी
पंचायत समिती,दौंड
संकलन
श्री शब्बीर शेख

Friday, 16 December 2016

नवनिर्मिती अॅप

आता नवनिर्मिती हॉटस्अप गृपवरील प्रत्येक मेसेज कधीही पाहा
केंद्राच्या ब्लॉगवर

केंद्राचा ब्लॉग-नवनिर्मिती

केंद्राचा ब्लॉग लिंक

जर ब्लॉगचा अड्रेस लक्षात राहत नसेल तर
नवनिर्मिती ब्लॉगचे अॅप मोबाईलवर इन्स्टॉल करा
 डाऊनलोड लिंक

अॅप डाऊनलोड लिंक

अॅप साईज 5mb
अॅपमधून
1.सरल साईट लिंक आहे शाळा,विद्यार्थी,स्टाफ,शापोआ माहिती भरता येणार
2.केंद्रातील प्रत्येक शाळेची माहिती पाहता येणार
3.जि प पुणे,शालार्थ,ई बुक अशा महत्वाच्या वेबसाईड  लिंक
4.गृपवर येणारे महत्वाचे मैसेज व फोटो सेव राहणार
 बरेच काही
ब्लॉगला भेट दिल्यास किंवा अॅप वापरल्यास पाहता येईल

Thursday, 15 December 2016

शैक्षणिक व्हिडिओ

विद्या प्राधिकरण, पुणे
वेब पोर्टलसाठी डिजिटल शैक्षणिक साहित्य संकलन
राज्यातील तंत्रस्नेही शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी खूप व्हिडीओ/अॅप बनवलेले आहेत. हे व्हिडीओ/अॅप अध्ययनासाठी उपयुक्त ठरत आहेत. असे सर्वोत्तम व्हिडीओ/ अॅप वेबपोर्टलवर ठेवण्यासाठी या फॉर्मद्वारे संकलन केले जात आहे.
तरी राज्यातील सर्व तंत्रस्नेही शिक्षकांना विनंती करण्यात येते की, त्यांनी स्वतः बनवलेले व्हिडीओची लिंक या फॉर्ममधून आमच्याकडे पाठवा.
a) Upload Video
Video upload link
b) Upload App
App upload link
- IT Department, Vidyapradhikaran, Pune

Wednesday, 14 December 2016

क्रीडा स्पर्धा

तालुका पातळीवर यशवंतराव चव्हाण कला-क्रीडा स्पर्धा
 दिं-16/12/2016 ते 17/12/16 रोजी
 जि प प्रा शाळा पिंपळगाव ता.दौंड येथे स.१०:३० वा सुरू होतील.
दिं.१६ ला सर्व मैदानी सांघिक व वैयक्तिक स्पर्धा व
दिं.१७ ला लेझीम,भजन व वक्तृत्व सांस्कृतिक स्पर्धा होतील.
----के.पी.शब्बीर शेख